




FIRST STEP TO SUCCESSFUL CAREER









Student
HelpLine
FIRST STEP TO SUCCESSFUL CAREER




Why Choose us
स्टुडेंट हेल्पलाइन सेंटर ची स्थापना सन 2014 मध्ये झाली. इंजिनियरिंगला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून असे ऐकण्यात आले की,चांगले मार्क्स असूनदेखहील, चांगली ब्रांच व चांगले कॉलेज मिळू शकले नाही. याचे कारण शोधले असता असे निदर्शनास आले की,
विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये बाबत संपूर्ण व सखोल माहिती नसल्यामुळे वरील अडचणीस दरवर्षी सामोरे जावे लागत आहे. त्यामध्येच दरवर्षी बदलणारी इंजिनियरिंगची प्रवेश प्रक्रिया यामुळे विद्यार्थी व पालक यामध्ये गोंधळाचे वातावरण दिसून येत आहे. इंजिनिअरिंग प्रवेश
प्रक्रिये बद्दल सखोल माहिती, प्रवेश प्रथम फेरीमध्ये घ्यावा, दुसऱ्या फेरीमध्ये घ्यावा की शेवटच्या फेरीपर्यंत थांबावे अशा अनेक अडचणी व समस्या लक्षात घेऊन त्यावर योग्य मार्गदर्शन करण्याच्या माध्यमातूनच स्टुडेंट हेल्पलाइन सेंटर ची स्थापना करण्यात आली.
वरील सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील इंजिनिअरिंग, मेडिकल, अर्कीटेक्चर, फार्मसी व विद्यापीठाचा सखोल अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळांना सुरुवात झाली. आजपर्यंत अनेक विद्यार्थी राज्यात नव्हे तर देशातील उत्कृष्ट कॉलेजमध्ये शिक्षण
घेऊन आज ते चांगल्या पदावर कार्यरत आहेत. ही सर्व फक्त योग्य मार्गदर्शनामुळेच घडले आहे असे विद्यार्थी सांगताना दिसून येते. अशा रीतीने सुरू झालेला प्रवास दरवर्षी एक पाऊल पुढे टाकत चालू आहे.
प्रत्येक गोष्ट जाणीव पूर्वक विचार करून माहिती घेऊन केली पाहिजे. शहराच्या मध्यवर्ती भागात स्टुडेंट हेल्पलाइन सेंटर चे सुसज्ज ऑफिस आहे. तसेच कन्सल्टन्सी मार्गदर्शनाचा 8 वर्षांचा अनुभव वरील उच्च शिक्षणाचे फायदे वेळोवेळी सेमिनार मधून दिले जाते की
ज्यामुळे स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याची एक छोटीशी कल्पना तयार होते. आज चांगल्या इंजिनिअरिंग,मेडिकल,आर्कीटेक्चर, फार्मसी कॉलेज मध्ये प्रवेश घ्यावयाचा असल्यास, मार्क कमी असल्यास लाखोंमध्ये डोनेशन भरून किंमत मोजावी लागते.
पण योग्य मार्गदर्शन आणि योग्य निर्णय क्षमतेमुळे ही आपण वाचवू शकतो. आजपर्यंत शेकडो विद्यार्थी व पालक यांनी या संधीचा लाभ घेतला आहे. आपण जय कोर्सला अॅडमिशन घेत आहोत. त्यामध्ये किती स्पर्धा परीक्षा आहेत त्या कोणत्या? आपल्यासाठी त्या योग्य आहेत का?
फ्रॉम भरणे, परीक्षा दिनांक, परीक्षा फीस, अंतिम दिनांक ह्या आणि अशा अनेक अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी स्टूडेंट्स हेल्पलाइन सेंटर कडून माहिती व मार्गदर्शन दिले जाते.
EXAM नंतर वेध लागतात ते निकालाचे, किती मार्क पडतील, मेरित नंबर के असेल, प्रवेशचे नियम के असतील कोणती शाखा निवडावी, चार वर्षानंतर त्या शाखेस महत्व असेल किवा नाही विशेषतः इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी टॉप कॉलेज, टॉप प्लेसमेंट, कमीतकमी किती
मार्क्स प्रवेशासाठी लागतात, पुणे विद्यापीठ मिळेल के असे एक ना अनेक हजारो प्रश्न पडत असतात रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी कन्सल्टन्सी तर्फे सांगितल्या प्रमाणे कॅप राऊंड, ऑप्शन फॉर्म, कॉलेज फीस स्टक्चर, ब्रांच-कॉलेज- यूनिवर्सिटी सिलेक्शन यासर्व प्रोसेस
सेमिनारद्वारे सहज व सोप्या पद्धतीने माहिती दिली जाते. तसेच सोबत प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शिका मोफत देण्यात येईल. या पुस्तकात मागील वर्षाचे कटऑफ, शुल्क रचना,वस्तीगृहाची जागा व संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे सर्व नियम मराठी व इंग्रजी भाषेत दिले जाते.
यासर्व बाबीमद्धे सर्वात महत्वाचे म्हणजे कॅप राऊंड आणि त्यामधील ऑप्शन फॉर्म, ऑप्शन फॉर्म भरताना सर्व नियम समजुनच ऑप्शन देणे जरुरीचे वाटते. तसेच ह्याच वेळेस कॉलेज फीस विचारात घेतली पाहिजे, की ज्यामुळे भविष्यात आपणास आर्थिक अडचणींना सामोरे
जाण्याची गरज भासणार नाही.
engineering,IIT,NIT,BITS,B.arch, polytechnic, medical(MBBS,BDS,BAMS,BUMS,BHMS & nursing),pharmacy(B&D), MBA,MCA या सर्वांना वरील प्रमाणेच माहितीची पद्धत असेल.
ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शनाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे वाटते, कारण होतकरू विद्यार्थ्यांचे माहिती अभावी नुकसान होवू नये. चल तर मग करूया सुरुवात. उच्च शिक्षित तर व्हायचेच आहे त्यासाठी कष्ट ही हवेतच..!
स्वप्न पाहणे सोप्पे आहे प्रयत्न ही केले आहेत. आता प्रत्यक्षात काय होणार या कडेच लक्ष ठेवू आपणा सर्वांना उज्ज्वल भवितव्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा.